शहरातील पोपटखेड रोड मार्गावरील आयटीआय नजीकच्या ट्राय सेम ट्रेनिंग हॉल येथे १२ टेबलवरील ९ फेऱ्यांमधून अकोट नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्ष व ३३ नगरसेवकांच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी पार पडणार असून यासाठी प्रशासनाने तयारी केली असल्याची माहिती आज शुक्रवारी प्राप्त झालीय. पोपटखेड रोड मार्गावरील ट्रायसेम ट्रेनिंग हॉल येथेच निवडणुकीतील मतदानाच्या मतपेट्या ह्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले आहेत. याच ठिकाणी रविवारी मतमोजणी पार पडणार असल्याने प्रशासन सज्ज झालेय.