भंडारा: बेला येथे आमदंगल कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन ; कुस्ती पाहण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी !
पंच कमिटी आखाडा व व्यायाम प्रसारक मंडळ बेला, तंटामुक्त समिती बेला, ग्रामपंचायत बेला व समस्त गावकरी बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी 22 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या आमदंगल कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या भव्य कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांचा सत्कार केला.