हिंगणघाट: शहरातील पंचायत समितीत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन मिशन अंतर्गत तालुका स्तरीय फराळ महोत्सव
हिंगणघाट पंचायत समितीत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन मिशन अंतर्गत तालुका स्तरीय फराळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या महत्त्वाचे उदघाटन समूह विकास अधिकारी सारसावले, तालुका प्रबंधक सचिन सावरकर, रवी नौकरकर, कविता लोखंडे यांनी केले.या महोत्सवात स्वयं सहायता बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले विविध दिवाली व्यंजन चकली, शंकरपाले, लड्डू, सेव, चिवड़ा, दिवे,मुर्ती,मातीचे खेळणे, मशरूम उत्पान घरेलू मसाल्याची विक्री केली या महोत्सवात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या