वाशिम: नवदुर्गा उत्सवादरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे अवैध दारु व जुगार अड्ड्यावर छापे, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
Washim, Washim | Oct 2, 2025 नवदुर्गा उत्सव तसेच येणारे सण उत्सव या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरीता पोलिस अधिक्षक अनुज तारे यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक प्रदिप परदेसी यांनी अवैध दारु विक्री तसेच जुगार अड्ड्यावर छापे मारुन 3 लाख 4 हजार 810 रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल केल्याची माहिती दि. 02 ऑक्टोबर रोजी दिली.