नवनिर्वाचित नगरपरिषद अध्यक्ष अद्याप अधिकृतरीत्या नगराध्यक्ष पदावर विराजमान झालेले नसताना, नगराध्यक्षांच्या केबिनच्या सुशोभीकरणासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात येत असल्याची जोरदार चर्चा यवतमाळ शहरात सुरू आहे. विशेष म्हणजे या खर्चासंदर्भात कोणतीही सर्वसाधारण सभा, ठराव किंवा अधिकृत बैठक न झाल्याची माहिती समोर येत आहे.....