विक्रमगड: स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाचे जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान आयोजन
केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी स्वस्थणारी सशक्त परिवार अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत पालघर जिल्हा परिषद महिला व बालविकास विभाग आणि आरोग्य विभागामार्फत अभियान राबवण्यात येणार आहे महिलांसाठी विविध वैद्यकीय तपासण्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सेवांचा लाभ घेण्यासाठी जवळच्या आयुष्यमान आरोग्य केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी केंद्रशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.