कोपरगाव: वारी परिसरात गोदावरी नदी पात्रात तरुण बेपत्ता
कोपरगाव तालुक्यातील वारी परिसरात गोदावरी नदीत एक तरुण बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयेश गणेश पेंढारे वय 21, रा. धोत्रे, हा तरुण काल दिनांक 4 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास वीरभद्र यात्रेसाठी भक्तांसोबत कावड (पाणी) आणण्यासाठी नदीकाठावर गेला होता. मात्र, अंधारात तोल जाऊन तो पाण्यात पडला आणि त्यानंतर त्याचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. याबाबत आज ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वा. तालुका पोलिसांनी माहिती दिली आहे.