तिरोडा: जि प हा. तथा क.महा, नवेगावबांध येथे जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी भेट देऊन घेतला शाळेचा सर्वांगीण आढावा
Tirora, Gondia | Dec 1, 2025 जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, नवेगाव बांध येथे जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी भेट देऊन शाळेची इमारत, परिसर, उपलब्ध सुविधा, अध्यापनाची स्थिती तसेच विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींचा सर्वांगीण आढावा घेतला. शाळेतील समस्या जाणून घेण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग यांच्याशी संवाद साधला. यावेळी संबंधित विभागाशी चर्चा करून आवश्यक त्या सुधारणा व दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात याव्यात अशा सूचना दिल्या.