शहरातील तिव्र होत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कुत्तरडोह प्रकल्पातून वाशिम शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याची मागणी भाजपा नेते राजू पाटील राजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेनाद्वारे केल्याची माहिती दि. 05 नोव्हेंबर रोजी दिली. या निवेदनामुळे प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला असून, नागरिकांमध्ये नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे.