रस्ता अडवून रस्त्यावरच वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी कुप्रसिद्ध गुंड राज पवार सह 16 जणांवर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपी राज पवारला लोणी काळभोर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. मात्र या कारवाईनंतर त्याच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात अंगावर रॉकेल ओतून गोंधळ घातला.