अवैध वाळू वाहतुकी विरोधात आज नांदेड जिल्ह्यातील मुदखेड मध्ये कडकडीत बंद पाडून मोर्चा काढण्यात आला. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने काल दुचाकीस धडक दिल्याने संतोष टाक यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आज दिनांक 17 डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या दरम्यान मुदखेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात युवकांची संख्या लक्षणीय होती. या मोर्चात सर्वपक्षीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही सामील झाले होते. अवैध वाढवा तो पूर्णपणे बंद करावी अशी मागणी यावेळी मोर्चेकरांनी केली.