100 दिवस कार्यक्रमांतर्गत पुसद तालुक्यामध्ये सुरुवात क्षयरोग दुरीकरण मोहिमेची सुरुवात.
4.6k views | Yavatmal, Maharashtra | Feb 10, 2025 यवतमाळ : जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आसिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पी एस चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद तालुक्यामध्ये 100 दिवस क्षयमुक्त अभियानाची सुरुवात करण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत तालुकास्तरावरील 6 प्राथमिक आरोग्य केंद्र 47 उपकेंद्र अंतर्गत 120 ग्रामपंचायत स्तरावर व शहरी भागात 2 UPHC तसेच एक उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा सदर मोहीम प्रभावीपणे राबवली जाणार आहे. याप्रसंगी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सागर जाधव यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा सांगून सदर कार्यक्रम 100% यशस्वी करण्याचे आवाहन केले.