शिरूर कासार: डॉ गर्जे आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी शिरूर कासार येथे पालवे कुटुंबीयांची भेट घेतली
डॉक्टर गरजे आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी पीडित पालवे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी सविस्तर संवाद साधत पोलिसांकडून अद्याप कुटुंबीयांचे जबाब नोंदवले गेले नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. या भेटीदरम्यान नीलम गोरे यांनी तात्काळ संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना फोन करून दोन दिवसांच्या आत कुटुंबीयांचे बयान नोंदवण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच आरोपीच्या भावंडांसह संबंधित सर्व संशयितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी ठाम भूम