यवतमाळ: खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत अनेकांना देण्यात आली नियुक्तीपत्रे
खासदार अरविंद सावंत आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये यवतमाळ येथे शिवसेना ठाकरे पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.यावेळी दिगंबर मस्के यांची उपजिल्हाप्रमुख राळेगाव विधानसभा, विकास पवार यांची युवा सेना लोकसभा संघटक, गजानन पोटे यांची शेतकरी सेना जिल्हा संघटक पदी नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी खासदार संजय देशमुख सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.