अर्जुनी मोरगाव: अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने मदत जाहीर आमदार राजकुमार बडोले यांचे महसूल मंत्री बावनकुळे यांना निवेदन
संपुर्ण गोंदिया जिल्ह्यासह अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात 24 ते 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे जी धान उत्पादक शेतकऱ्यांची विपरीत हानी झाली.शासन निर्णयामध्ये समावेश करून धान उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशा आशयाचे निवेदन अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी प्रत्यक्ष मुंबईत जाऊन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले. व यासंदर्भात झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती ही दिली.