हिंगणघाट: सेवा पंधरवडा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराजअतर्गत मोहगांव येथे जनावरांसाठी लसीकरण व उपचार शिबीर
शासनाच्या वतीने सेवा पंधरवडा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येते असून यावेळी विविध सामाजिक कार्यक्रम राबविल्या जात आहे.याच अनुषंगाने मोहगांव ग्रामपंचायत व पशुवैद्यकीय चिकीत्साच्या वतीने सरपंच विलास नवघरे यांच्या मार्गदर्शनात संततधार पावसामुळे जनावरांवर येत असलेल्या लंम्पीससह विविध आजारावर आळा घालण्यासाठी लसीकरण,व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पशुधन पर्वक्षक डॉ आकाश गिरी,पियूष वाघमारे, विकास तायडे यांनी गावातील शेकडो जनावरांवर उपचार केला.