रावेर: सावदा मुक्ताईनगर रोडवर पोलीस ठाण्याच्या समोर गोवंश वाहतूक करणारे वाहन पकडले, सावदा पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Nov 20, 2025 रावेर तालुक्यात सावदा शहर आहे येथून मुक्ताईनगर कडे जाणाऱ्या रोडावर पोलीस स्टेशनच्या समोरून वाहन क्रमांक एम.एच.१४ डि.एम.२१६३ मध्ये दोन गोवंश वाहन चालक फरहान शेख व मोहित नारखेडे नेत होते. पोलिसांनी वाहन पकडले गोवंश वाहन असा एकूण एक लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त केला व दोघांविरुद्ध सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.