उत्तर सोलापूर: बाहुबली जैन मंदीर व धानम्मा देवी मंदीरातील चोरी उघडकीस; पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांची पत्रकार परिषदेत माहिती...
सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरातील बाहुबली जैन मंदिर आणि धानम्मा देवी मंदिरात झालेल्या चोरीचा पर्दाफाश करून सोलापूर शहर गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत तिन्ही सराईत चोरट्यांना जेरबंद केले आहे. या प्रकरणाची माहिती पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सोमवारी सायं 5 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.