आर्णी: शिक्षक शैक्षणिक वेळेत राजकीय कार्यक्रमात; दोषी शिक्षकावर कार्यवाहीची मागणी
Arni, Yavatmal | Nov 8, 2025 शिक्षण हा समाजाचा कणा मानला जातो, पण तोच कणा आज राजकीय मोहिमांच्या ओझ्याखाली वाकतांना दिसतो आहे. आर्णीतील एका सुप्रसिद्ध शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता शाळेच्या वेळेतच शहरातील विश्रामगृह येथे राजकीय कार्यक्रमात हजेरी लावल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.या कार्यक्रमासाठी जवळपास ३५ ते ४० शिक्षकांनी शाळा चालू असताना विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून राजकीय तिकीट चाचपणी च्या कार्यक्रमात भाग घेतला. विद्यार्थ्यांचे तास बंद ठेवून शिक्षकांनी राज