आगामी जालना शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना येथील शिवसेना कार्यालयात इच्छुक नगरसेवक उमेदवारांच्या मुलाखती मोठ्या उत्साहात पार पडल्या. बुधवार दि. 24 डिसेंबर 2025 रोजी सांयकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या मुलाखती अंदाज समिती प्रमुख तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या. या प्रक्रियेला इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याने शिवसेना कार्यालय परिसरात दिवसभर तुफान गर्दी पाहायला मिळाली.