जलालखेडा येथील अल्पवयीन मुलांना करण्यात आलेल्या अमानुष मारहाण प्रकरणी आता दोषी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धोंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.बालकल्याण समितीने या प्रकरणात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्ह्याची कलमे वाढवण्याचे लेखी आदेश दिले आहेत. प्रहारचे दिनेश निंबाळकर यांच्या तक्रारीनंतर बाल संरक्षण पथकाने चौकशी केली होती. आज तिन्ही पीडित मुलांना नागपूरच्या बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले.