संग्रामपूर: नवीन अंगणवाडी बांधकामासाठी प्रत्येकी ११ लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजूर - आमदार डॉ. संजय कुटे
संग्रामपूर जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील जामोद, सावरगाव, सुनगाव, कोलद, आसलगाव, पिंपळी (जहागीर), टूनकी आणि लाडनापूर या गावांमध्ये नवीन अंगणवाडी बांधकामासाठी प्रत्येकी ११ लाख २५ हजार रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार डॉ संजय कुटे यांनी २ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता दिली आहे.