धुळे: ओला दुष्काळ जाहीर करा!"; याच मागणीसाठी नगावमध्ये आमदार राम भदाणेंच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन, सरकारला थेट इशारा!
Dhule, Dhule | Sep 29, 2025 अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप करत, आज संभाजी ब्रिगेड आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या निवासस्थानासमोर 'ढोल बजाव' आंदोलन करत, या संघटनांनी सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी कार्यकर्त्यांनी आमदारांच्या घराबाहेर जोरदार निदर्शनं केली.