सिल्लोड: तालुक्यातील मोढा फाटा येथे डुबलीकेट खतासह एका आरोपीला अटक कृषी विभाग व सिल्लोड ग्रामीण पोलीस यांची कारवाई
आज दिनांक 7 नोव्हेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील मोढा फाटा येथे कृषी विभागाचे अधिकारी प्रमोद पांडुरंग डाके वय 35 वर्ष कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण विभाग सिल्लोड यांनी सदर ठिकाणी छापा मारला असतं आरोपी मोहन वसंत हिरे हे स्वतःच्या फायद्यासाठी विविध कंपन्याचे खतामध्ये मिक्सिंग करून खत विक्री करत असल्याने त्यांच्याविरुद्ध कृषी विभागाच्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी गुन्हा दाखल केला आहे