चाळीसगाव: चौधरी वाडा, भीम नगर, नवागाव परिसरात रोगराईचा उद्रेक; लहान मुलांना डेंग्यू, टायफॉइडची लागण!
चौधरी वाडा, भीम नगर, सुवर्णाताई नगर आणि नवागाव परिसरामध्ये पावसाळ्यानंतर साचलेल्या मोठ्या प्रमाणातल्या घाणीमुळे आणि गटारांच्या तुंबण्यामुळे रोगराईचा मोठा उद्रेक झाला आहे. परिसरातील अनेक लहान बालकांना डेंग्यू (Dengue), टायफॉइड (Typhoid) आणि मलेरियाची (Malaria) लागण झाली असून, नागरिकांमध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या जाणवत आहेत. नगरपालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या या समस्येकडे झालेल्या 'स्पेशल' दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.