सातारा ; डॉ. नुसरत परवीन यांना नियुक्तीपत्र देताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या चेहऱ्यावरील हिजाब (बुरखा) काढण्यास भाग पाडून प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले भारतीय संविधान सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देते. या धार्मिक व सांस्कृतिक विविधतेमुळेच भारताचा जगभरात सन्मान केला जातो. मात्र, या घटनेनंतर भारतीय जनता पक्षाचे अनेक वरिष्ठ मंत्री व अधिकारी मुस्लिम समाजाविरोधात जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारची भाषणे ही वांशिक अपशब्दांना खतपाणी घालणारी आहे