रामटेक: बोरडा (सराखा) गावाजवळील वीट भट्ट्यावरील मजूर महिलेला झोपेत विषारी मण्यार सापाने घेतला चावा
Ramtek, Nagpur | Sep 27, 2025 आरोग्य केंद्र मनसर अंतर्गत येणाऱ्या बोरडा (सराखा) गावालगतच्या वीटभट्ट्यावर मजुराचे काम करणाऱ्या ममता पटेल वय 21 वर्षे ही शुक्रवार दि. 26 सप्टेंबरच्या रात्री आपल्या घरी दीड महिन्याच्या मुलासह आपल्या घरी जमिनीवर झोपली असता मध्यरात्री तीन वाजताच्या दरम्यान तिच्या घरात विषारी मन्यार चापाने प्रवेश केला व झोपलेल्या ममता हिला पायाला चावा घेतला. मात्र गावातील समाजसेवक व सर्पमित्र यांच्या मदतीने तिचे प्राण वाचविता आले.