कार्तिकी एकादशीनिमित्त प्रभु पद्मेश्वर आरती मंडळाच्या वतीने वाशीमच्या ऐतिहासिक पद्मतीर्थ तलाव परिसरात दीपोत्सवाची भव्य प्रकाशमय सजावट करण्यात आली. धार्मिक उत्साह, भक्तीची ओल आणि सुवर्ण सौंदर्याने नटलेला पद्मतीर्थावर आज वाशीमकरांनी सामुहिक दीपोत्सव साजरा केला. कार्तिकी एकादशीला दरवर्षी पद्मतीर्थावर दीपोत्सवाचे आयोजन केले जात असून यंदाचे आयोजन अधिक भव्य आणि आकर्षक झाले.यावेळी संत-महंत, समाजातील मान्यवर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रभु पद्मेश्वराची महाआरती करण्यात आली