दारव्हा: महागाव कसबा येथे ले-आऊटमधील खड्ड्यात बहिण-भावाचा बुडून मृत्यू
घरून खेळायला गेलेल्या दोन निष्पाप बहिण-भावाचा ले आऊटमधील एका खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी व हृदयद्रावक घटना महागाव कसबा येथील साईनगरीमध्ये १ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजता उघडकीस आली. अशी माहिती लाडखेड पोलिसांनी आज दिनांक 2 ऑक्टोबरला दुपारी १ वाजता दरम्यान दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून माध्यमांना दिली आहे.