धुळे महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त नितीन कापडणीस यांनी पदभार स्वीकारताच शहराच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केलं आहे. आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना कडक सूचना देत मुख्य रस्त्यांवरील गवत-झुडपं तात्काळ साफ करण्याचे आदेश दिले. व्यापाऱ्यांना डस्टबिनचा वापर बंधनकारक करण्यात येणार असून, रात्री कचरा संकलन आणि मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.