अंजनगाव तालुक्यातील ग्राम निंभारी येथे विषबाधेमुळे १३ बकऱ्यांचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना आज सकाळी ७ वाजता निंभारी गावात उघडकीस आली विषबाधेमुळे १३ बकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूमुळे पशुपालकावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.पशुपालक हे नेहमी प्रमाणे बकऱ्यांना चारण्या करिता निंभारी गावाला लगत एका पडीत शेतात घेऊन गेले होते संध्याकाळी बकऱ्या परत आणल्या रात्रीपर्यंत सर्व ठीक होतं.पण सकाळी उठून पाहिलं तर सगळ्या बकऱ्या निपचित पडलेल्या होत्या.