जालना: दि २/३/२६ राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ३० वर्षांच्या वरील नागरिकांनी नियमित रक्तदाब तपासणी करणे आवश्यक आहे. कारण यामुळे रोग निदान होऊन उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य होते. ज्यामुळे पुढील आरोग्य समस्या टाळता येईल. आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमी असावे. शासकीय रुग्णालयात रोग निदान व उपचार मोफत उपलब्ध आहे.