सिंदखेड राजा: शहरात 100 बेडचे उपजिल्हा रुग्णालयासाठी जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन
सिंदखेड राजा शहरात 100 बेडचे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यात यावे,दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व उपकरणे देण्यात याव्या व जालना मेहकर रोडवरील वाहणारी सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देण्यात यावी यासह विविध मागणीची निवेदन जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांना देण्यात आले आहे.