भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदी उडान पुलाजवळ पल पल हॉटेल समोर मोटरसायकल अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि. 28 डिसेंबर रोजी दुपारी 3.25 वा. दरम्यान उघडकीस आली आहे. रंजना मधुकर खोब्रागडे वय 50 रा. पारडी नागपूर हे आपल्या नातेवाईकासोबत मो. सा. क्र. MH 49 V 2686 ने भंडाऱ्याकडून लाखनी कडे जात असता पल पल हॉटेल समोर ब्रेकर वर मो. सा. अनियंत्रित झाली व ते मागेहुन पडल्याने त्यांच्या डोक्याला व खांद्याला गंभीर दुखाप