सेलू: मोर्चापुर शिवारातून शेतीउपयोगी साहित्याची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध सेलू पोलिसांत तक्रार दाखल
Seloo, Wardha | Oct 15, 2025 तालुक्यातील मौजा मोर्चापुर शिवारात शेतकऱ्यांच्या शेतातून शेतीउपयोगी साहित्याची चोरी झाल्याची घटना घडली असून, या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध रामकृष्ण श्रावण काटोले (वय 69, रा. मोर्चापुर) यांनी ता. 14 ला सायंकाळी 7.15 वाजता सेलू पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ही घटना दि. 14 ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली असून, चार शेतकऱ्यांच्या शेतातून पिकांना ओलित करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य चोरीस गेले आहे.