तळा: जोगवाडी येथे ग्रामदेवता श्री चंडिका देवीचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न
Tala, Raigad | Mar 26, 2024 तळा शहरातील जोगवाडी येथे मंगळवार दि.२६ मार्च रोजी रात्री आठ वाजताच्या दरम्यान तळा शहराची ग्रामदेवता श्री चंडिका देवीचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. या पालखी सोहळ्यात उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,नगरसेवक मंगेश पोळेकर, शिवसेना शिंदेगट शहर प्रमुख राकेश वडके यांसह जोगवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.