नांदुरा: अवकाळी पाऊस नुकसान भरपाई वंचित लाभार्थ्यांसाठी बुधवारी विशेष शिबिराचे आयोजन
नांदुरा तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते,त्यांच्यासाठी शासनाकडून नुकसान भरपाई अनुदान मंजूर करण्यात आले आहे.बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.तथापि,अद्यापही काही लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी (शेतकरी आयडी) प्रणालीमध्ये अद्ययावत (update) नसल्यामुळे, त्यांना अनुदानाची रक्कम हस्तांतरित करण्यात तांत्रिक अडचण येत आहे.अशा शिल्लक राहिलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष शिबिराचे केले