“लहानपणी एकोप्याने राहणारे भाऊ-बहीण आज पैशाच्या हव्यासापायी नातीगोती विसरू लागले आहेत. एकमेकांवर तक्रारी, संपत्तीवरून वाद वाढत आहेत. अशा परिस्थितीत मध्यस्थी करून नाती जपणे, समाजात एकोपा आणि सौहार्द टिकवणे हे आपले कर्तव्य आहे,” असे विचार उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाच्या मुख्य न्यायमूर्ती सौ. वृषाली जोशी यांनी व्यक्त केले. त्या आज रविवारी ता. १८ जानेवारीला सकाळी ११.३० वाजता सेलू येथील किंग्स रिसोर्ट लॉन्सवर आयोजित विधी सेवा महाशिबीरात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.