धुळे: धुळ्यातील देवपुरात भीषण अपघात: एसटी बसच्या चाकाखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू, चालक ताब्यात
Dhule, Dhule | Sep 29, 2025 धुळे शहरातील देवपूर भागात जुना आग्रा रोडवर, एसटी महामंडळाच्या बसखाली चिरडून एका दुचाकीस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. जयवंत रामदास पाटील वय ७२, राहणार श्रीकृष्ण कॉलनी, देवपूर धुळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही भीषण घटना सोमवारी, दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन ते साडेचारच्या सुमारास दत्त मंदिर चौक ते जीटीपी स्टॉप दरम्यान असलेल्या यशोदा हॉस्पिटलसमोर घडली. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आणि वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.