सिंदखेड राजा: तालुक्यात पुन्हा पावसाचा कहर,शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
सिंदखेडराजा तालुक्यात 27 सप्टेंबर रोजी दिवसभर व रात्री आणि 28 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता अतिवृष्टी व ढगफुटीसदृश पाऊस झाला. या अनिर्बंध पावसामुळे शेतकऱ्यांची पिके पुन्हा पाण्याखाली गेली आहेत. आधीच नुकसान झालेल्या पिकांवर या पावसाने आणखी कहर केला आहे.या पावसाने सोयाबीन कपाशी तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.