दारव्हा: कोहळा येथे लाकडी काठीने मारहाण केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध दारव्हा पोलिसात गुन्हे दाखल
फिर्यादी राजू सिंग हिरासिंग चव्हाण यांच्या तक्रारीनुसार 26 सप्टेंबरला सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आरोपी शाम चव्हाण व आणखी तीन अशा चौघांनी फिर्यादीच्या घरी येऊन फिर्यादीस शिवीगाळ करून हातातील लाकडी काठीने व थापडाबुक्क्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी 26 सप्टेंबरला रात्री अंदाजे सव्वा 11:00 वाजताच्या सुमारास दारव्हा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.