धुळे शहरातील नगावबारी परिसरातील केदार ड्रम सिटी येथील प्लॉट क्रमांक २४ वरून दीपक वामन पवार यांची हिरो होंडा शाइन दुचाकी चोरीला गेली. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही दुचाकी न सापडल्याने पवार यांनी २४ ऑक्टोबर रोजी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.