धुळे: धुळ्यात नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; धुळे एसपी श्रीकांत धीवरेंकडून नागरिकांना सुरक्षेचे आवाहन
Dhule, Dhule | Sep 22, 2025 घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी धुळे पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाभरात विशेष 'ॲक्शन प्लॅन' तयार करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वतः या तयारीची माहिती देत, नागरिकांना उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले आहे.