जालना: कामचुकार अधिकार्यांचा खा.डॉ.कल्याण काळे यांनी घेतला समाचार;दिशा समितीच्या बैठकीला गैरहजर अधिकार्यावर कारवाईचे निर्देश
Jalna, Jalna | Sep 15, 2025 सर्वसामान्य जनतेची आडवणूक करणार्या आणि विविध योजनेचे प्रस्ताव प्रलंबीत ठेवणार्या कामचुकार अधिकार्यांचा खा. डॉ. कल्याण काळे यांनी चांगलाच समाचा घेतला असून काम न करणार्या आणि बैठकीला गैरहजर राहणार्या अधिकार्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश खा. डॉ. कल्याण काळे यांनी दिलेत. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) चे अध्यक्ष तथा खासदार डॉ. कल्याण काळे यांनी सोमवार दि. 15 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बैठक घेतली.