कसाल येथे ज्येष्ठ नागरिकांकरिता आरोग्य शिबिर संपन्न
263 views | Sindhudurg, Maharashtra | Oct 5, 2025 आज दिनांक 05/10/2025 रोजी राष्ट्रीय वृद्धापकाळ दिनाचे औचित्य साधून कसाल जेष्ठ नागरिक संघ येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर आरोग्य शिबिरामध्ये वृध्द नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार देण्यात आले.तसेच रक्ततपासणी देखील करण्यात आली. तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.सदर शिबिराला डॉ.भडांगे मॅडम, तसेच NPHCE व NPNCD स्टाफ तसेच हिंद लॅब टेक्निशियन उपस्थित होते.