लोणार तालुक्यातील भुमराळा ते किनगाव जटटू दरम्यानच्या अत्यंत महत्त्वाच्या डांबरी रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत भाजपा जिल्हा अध्यक्ष सोशल मिडिया देवानंद सानप यांनी गणपती बाप्पा ची आरती म्हणत खड्यांचे पुजन करत आंदोलन केले होते या आंदोलनाने प्रशासन व ठेकेदारांना अक्षरशः खडबडून जागे केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात या अनोख्या आंदोलनाची प्रचंड चर्चा असून, अखेर आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी ठेकेदाराने डांबरी रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.