मानवी यशाचे रहस्य व्यक्तीच्या मनातील एकाग्रतेत दडलेले असते यासाठी भूतलावरील सर्व व्यक्तींनी विशेषतः युवकांनी स्वामी विवेकानंद यांच्या मनाच्या एकाग्रतेचे पाठ गिरविल्यास त्यांना विविध क्षेत्रात यशाची शिखरे गाठता येतील असे वक्तव्य सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी तथा जेष्ठ साहित्यिक धोंडीरामसिंह राजपूत यांनी वैजापूर येथील जि.प्रशाला येथे राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आयोजीत कार्यक्रमात मार्गदर्शन करत असताना केले.