बुलढाणा: जिल्हा रुग्णालयाजवळ सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरातून 1 लाख 5 हजाराचे
सोन्याचे दागिने लंपास
बुलढाणा शहरातील एक सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरातील लक्ष्मी पूजनातील तब्बल 1.5 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णाजवळ राहणारे सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी माधव शंकरराव देशपांडे यांच्या घरात ही चोरीची घटना मध्यरात्री घडली होती.