भोकर: भोकर तालुक्यातील सावरगाव मेट येथे घरफोडी अज्ञात चोरट्याविरुद्ध विरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Bhokar, Nanded | Nov 6, 2025 दिनांक पाच नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान फिर्यादीच्या घरी सावरगाव मेट, ता. भोकर,येथे, घरफोडी फिर्यादीच्या घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुन 61,500/- रू चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला फिर्यादी संदीप शंकरराव बंदगुलवाड वय 38 वर्षे, रा. सावरगाव मेट, ता. भोकर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन भोकर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकों कळणे हे करीत आहेत.