जळगाव: शासकीय विश्रामगृहात महायुतीच्या बैठकीवर आक्षेप; आचारसंहिता भंग केल्याचा ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख संजय सावंत याचा आरोप
महापालिका निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू असतांना भाजप आणि शिंदे गटाने शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेवून आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत त्या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रा दाखल करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना उबाठाचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी रविवारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकारांशी बोलतांना सांगितले.